रोटरॅक्ट वेस्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव- चांगला माणूस म्हणून घडण्याची आज गरज असून त्यामुळे सभोवतालची नकारात्मकता घालविण्यासाठी रोटरॅक्ट एक उत्तम व्यासपीठ आहे असे माजी प्रांतपाल महेश मोकलकर यांनी प्रतिपादन केले.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर वेस्टच्या अध्यक्षा संगिता पाटील, मानद सचिव राजेश परदेशी, रोटरॅक्टच्या विभागीय प्रतिनिधी हेमांगी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरॅक्टचे नुतन अध्यक्ष शंतनु अग्रवाल व सहसचिव अफाक मेनन यांना मान्यवरांच्या हस्ते कॉलर, पीन, चार्टर प्रदान करण्यात आले. यावेळी बोलतांना मोकलकर यांनी रोटरॅक्टचे महत्व सांगत आजच्या गुगल पिढीतील युवकांनी सामाजिक कार्यातून कर्तृत्वाची शिदोरी करइरसाठी निर्माण करावी असे सांगून रोटरॅक्टमुळे व्यक्तीमत्व विकासाबरोबर नेटवर्किंग वाढते त्यामुळे नेटवर्किंग हाच सक्सेस मंत्रा आहे असेही सांगितले.
अध्यक्षा संगिता पाटील यांनी रोटरॅक्टचे आजचे सदस्य उदयाचे रोटरी सदस्य असून रोटरी वेस्टचे सदैव रोटरॅक्टला सहकार्य राहिल अशी ग्वाही दिली. मानद सचिव राजेश परदेशी व हेमांगिनी महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. नुतन अध्यक्ष शंतनु अग्रवाल यांनी आगामी कार्याचा संकल्प व्यक्त करतांना कमवा, शिका उपक्रम, मुलाखत तंत्र कार्यशाळा, यासह विविध कार्यक्रम करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी नुतन कार्यकारणी घोषित केली. त्यात सचिव धिरज फटांगळे, कोषाध्यक्ष सचिन पटेल, तर सदस्य म्हणून अमृत मित्तल, मिताली वाणी, आयुष गौड, आदित्य पाटील, गौरव देशमुख, रुपेश पाटील आदिंचा त्यात समावेश आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन अमृत मित्तल तर डीआरआर संदेश वाचन मिताली वाणी यांनी केले. कार्यक्रमास रोटरी वेस्टचे आरसीसी हकीम बुटवाला, माजी अध्यक्ष ऍड.सुरज जहांगिर, सुनिल सुखवाणी, केकल पटेल आदिंसह विविध रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.