निगडीत विविध विकासकामांचे भूमिपूज
निगडी : कामाची गरज ओळखून, जनतेला चांगल्या प्रकारच्या सेवा पुरविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्यावतीने शहरात विविध विकासकामे करण्यात येत असतात. आपल्या वॉर्डातील महत्वाची कामे मार्गी लागली तर नागरिकांना त्रास होत नाही. त्यामुळे विकासकामांसाठी पाठपुरावा करून ती पूर्ण केली पहिजेत. त्यामुळे जनतेला याचा फायदाच होणार असतो, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील से.नं.22 साईनाथनगर, यमुनानगर निगडी या ठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, अनुराधा गोरखे, नगरसेवक उत्तम केंदळे, माजी नगर सेवक जितेंद्र पवार, उपअभियंता शहाजी गायकवाड, मोहन खोदंरे, कनिष्ठ अभियंता वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
विविध विकासकामे
प्रभाग क्र.13 निगडी गावठाण येथील साईनाथनगर मधील रस्त्याचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणे, निगडी गावठाण येथील साईनाथनगर मधील रस्त्याचे कलर्ड चेकर्ड टाईल्स बसविणे, निगडी गावठाणमध्ये ठिकठिकाणी स्टाँर्म वॉटर लाईनची दुरुस्ती करणे, पवळे उड्डाणपुल ते एल. आय. सी. इमारती पर्यंतच्या रस्त्याचे कडेने कलर पेव्हींग ब्लॉक बसविणे, यमुनानगर मधील त्रिवेणीनगर चौक ते एल. आय. सी. इमारती पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, मधील मोकळ्या जागांवर चेनलिंक फेन्सिंग करणे व परिसरातील अनुषंगीक कामे करणे, से.नं.22 मधील बुद्धविहार बौध्दनगर येथे काँक्रिटीकरण करणे, राजनगर येथील समाजमंदीर दुरुस्ती, व्यायाम शाळा दुरुस्ती तसेच संजयनगर समाजमंदीर दुरुस्ती करण करणे आदी कामांचा समावेश होता.
यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक सुमन पवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी यांनी केले. तर आभार नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मानले.