मधुश्री व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप
निगडी : टीका व विरोध व्हायला हवा परंतु तो तात्विक असावा, सत्यपरिस्थिती जाणून मग बोलावे. आधाराविना व वैयक्तिक टीका करू नये. 48 वर्ष इतरांनी देश चालवला आता 48 महिन्यात भाजपने किती यशस्वी कारभार केला आहे, हे दिसून येत आहे. देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. नागरिक त्यांना हवा असलेला नेता निवडतो, तो त्यांचा अधिकार आहे. अशा लोकोत्सवातून राजा निर्माण व्हावा, असे मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. ही विदर्भ सहयोग मंडळ प्राधिकरण आणि मधुश्री कलाविष्कारतर्फे आयोजित मधुश्री व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपचे युवा प्रमुख अनुप मोरे, राज्य लोकसेवा समितीचे सचिन पटवर्धन, बाळा चंद्रकांत शिंदे, मधुश्री कलाविष्काराच्या अध्यक्षा माधुरी ओक, सलीम शिकलगार तसेच डॉ. दिगंबर इंगोले, शरद इनामदार, राजाभाऊ गोलांडे, राजीव कुटे, विजय सिनकर, मारुती भापकर, राजेंद्र घावटे, प्रदीप पाटील, सुदाम मोरे, मुकेश सोमैया, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
विविध विषयांवर टाकला प्रकाश
उपाध्ये यांनी याप्रसंगी शेतकर्यांसाठी केलेले काम, नोटबंदी मागची दूरदृष्टी, पेट्रोल दरवाढी मागची भूमिका, लककरच पेट्रोल-डिझेल जीएसटीमधे येणार याबाबत सुरु असलेली केंद्रातली उपाय योजना, शोचालय व स्वच्छता अभियानाची जनजागृती, विविध अॅप्स्मुळे भ्रष्टाचार मुक्ती आदी विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी विविध सामाजिक मंडळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन राधिका बोर्लिकर, अजित देशपाडे, उज्जवला केळकर यांनी केले. सलिम शिकलगार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले.