जामनेर( प्रतिनिधी):- वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचे दि.१९ मार्च रोजी अपहरण करून खुन करून मृतदेहाची मोहाडी तालुका पाचोरा परिसरात शेतातील विहिरीत फेकून फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी वापरण्यात आलेली गाडी नंबर एम एच ०२/ ए.एल. ८७६६ जप्त करण्यात आली आहे.
ही गाडी आरोपी महेंद्र श्यामसिंग राजपूत (रा.शेळगाव ता.जामनेर) यांनी कबुली देऊन गाडी दाखविली. पंचानामा करून डी.वाय.एस.पी ईश्वर कोतकर शेळगाव येथील शहापूर रोडवर एका बंदिस्त वाड्यात आढळून आली. ती गाडी पंचनामा करून गाडीतील रक्ताचे डागाचे पंचनामा केला व नंतर ती गाडी पोलिसांनी जप्त केली. डि. वाय. एस. पी. ईश्वर कोतकर यांच्याशी संपर्क साधला असता गोपीनिय अहवाल असल्याने सध्यातरी आम्ही तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकत नाही. यावेळी डि.वाय.एस.पी. ईश्वर कोतकर, पहुरचे पीएसआय किरण बर्गे, पो.काँ. शंशिकात पाटील, किरण पाटील, जामनेर पोलिस स्टेशनचे पो.काँ.राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.