चांदपुरीजवळच्या अपघातात दोघे ठार

0

शिरपूर तालुक्यातील घटना

शिरपूर । प्रतिनिधी । शिरपूर तालुक्यातील चांदपुरी गावालगत आज पहाटे तीन वाजता ट्रक्टर उलटून दोन युवक ठार झाल्याची घटना घडली.

तालुक्यातील चांदपुरी गावाजवळ येत असलेल्या ट्रक्टर वर तालुक्यातील हिगोणी येथील गोपाल राजेंद्र निकम वय २२ वशिगांवे येथील विशाल प्रमोद पाटील वय १९ हे येत असतांना अचानक ट्रक्टर उलटले त्यात खाली दाबले गेल्यामुळे दोघाचा मुत्यु झाला. त्यांच्या मोटार सायकलचे पेट्रोल संपल्यामुळे ते ट्रक्टरवरून येत होते. दोन्ही मृत तरूण एकलुते असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.