चांदवड घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

0

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात पिकअप, ट्रक आणि गॅस टँकर या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे वाहतूकीची कोंडी झाली.या अपघातात पिकअप आणि ट्रक मधील तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गॅस टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. अपघातामुळे या महार्गावरील ठप्प झाली होती.