जळगाव- चांदसर (ता. धरणगाव) येथील श्री दत्त हायस्कुलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपशिक्षक दीपक रमेश चव्हाण यांचा फुलब्री (जि.औरंगाबाद) येथे कार अपघातात जागीच मृत्यू झाला. पुणे येथून घरी परतत असताना गुरुवारी पहाटे हा अपघात झाला.
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात ते वास्तव्यास असून, मुळचे कानळदा (ता. जळगाव) येथील रहिवासी आहेत. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री दत्त हायस्कुल चांदसर येथे गेल्या अनेक वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुणे येथे मुलाच्या ऍडमिशनसाठी गेले होते. ऍडमिशन घेवून घरी परतत असताना फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथे पहाटेच्या सुमारास कारचा अपघात झाला. यात दीपक चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चौघे जखमी आहेत.