धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – स्वागताध्यक्ष संदीप उपरे यांचे आवाहन
अंबाजोगाई : परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही दि. 26 जानेवारी शनिवार रोजी सकाळी 10 वाजता पाचव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परीषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), पुज्य भिक्खू पय्यारत्न (नांदेड), पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे व धम्म परिषदेचे संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व राजेंद्र घोडके आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
26 जानेवारी रोजी पाचव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 9 वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल. या धम्म परिषदेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 2017-18 प्राप्त केशव गोरोबा कांबळे(लातूर) आणि त्रिवेणीताई कसबे – पोटभरे या मान्यवरांचा विशेष सत्कार होईल. या परीषदेच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर वडमारे तर यावेळी धम्मपीठावर अॅड.अनंतराव जगतकर, प्रा.प्रदिप रोडे नगरसेवक सचिन कागदे, भामाबाई किसन हनवते, सरपंच डी. एस. राठोड, सरपंच मनोहर केदार, प्रा.डॉ.विनोद जगतकर यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संयोजन समितीने चांदापुर येथे होणार्या या धम्म परिषदेची सर्व तयारी पुर्ण केली आहे. वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द, अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तरी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी जनतेने पांढरे वस्त्र परिधान करूनच या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत इंगळे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, सिमा चंद्रकांत इंगळे, सुरेखा प्रल्हाद रोडे, संयोजन समितीचे प्रा.गौतम गायकवाड, मुरलीधर कांबळे,अर्जुन वाघचौरे, माणिक रोडे, मधुकर वेडे, व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे, राज जगतकर,प्रभाकर बडे, प्रा.बी.एस.बनसोडे, राजाभाऊ घाटे, संजय साळवे,दयानंद सावळे, सुरेखा रोडे, अर्जुन काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड, रूक्मिण गोरे, संदीप वैद्य,प्रसिध्दीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर,आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.