जळगाव – गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सातत्याने भाववाढ होत गेलेल्या चांदीच्या भावात आता साडेसहा हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
18 नोव्हेंबर रोजी 68 हजार रुपये प्रतिकिलो असणारे चांदी आता 62 हजार रुपये प्रतिकिलो झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची औद्योगिक मागणी घटल्यामुळे चांदीचा भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे चांदीची मागणी कमी होत असली तरी सोन्याची मागणी कायम असल्याने सोन्याचं भवत अजून घसरण झालेली नाही.