‘चांदोरकर’तर्फे खान्देशातील पहिले व्यावसायिक नाटक

0

जळगाव । खान्देशातील पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग चांदोरकर प्रतिष्ठान जळगाव व श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन मुंबई संयुक्त विद्यमाने निर्मिती क्षेत्रातील पहिले पाऊल स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाने खान्देशच्या कलाप्रांतात गेल्या सोळा वर्षापासून महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे. संगित आणि नृत्याच्या क्षेत्रातली राष्ट्रीय स्तरावरची कलाकृती खान्देशच्या रसिकांसमोर सादर केली आहे. वेगळ काही करण्याचा ध्यास प्रतिष्ठानाने ठेवला म्हणून आता नाट्यकलेच्या क्षेत्रात पदार्पण करायचे ठरविले आहे.

डॉ.हेमंत कुळकर्णी लिखित व दिग्दर्शित संगीत संशेवकल्लोळ
या नाटकाचा पहिला प्रयोग निमंत्रित रसिकांसमोर सादर होत आहे. या नाट्यप्रयोगाला मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन हे उपस्थित राहणार असून किशोर राजेनिंबाळकर जिल्हाधिकारी, दत्तात्रय कराळे पोलीस अधिक्षक, जीवन सोनवणे आयुक्त मनपा, अशोक जैन अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम लि. उपस्थित राहणार आहेत. या सोबत खान्देशातील नाट्य समिक्षकांची विशेष उपस्थिती या नाट्यप्रयोगास लाभणार आहे. या शुभारंभाच्या प्रयोगानंतर संपुर्ण महाराष्ट्रात नाटक प्रयोग करण्यासाठी सिध्द होत आहे. हा नाट्यप्रयोग बघण्यासाठी उत्सुक असणार्‍या रसिकांसाठी मोजक्या प्रवेशिका उपलब्ध असून यासाठी रसिकांनी चांदोरकर प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त सौ.दिपिका चांदोरकर मो.नं. 9823077277 यांचेशी संपर्क करावा असे सूचित करण्यात आले आहे.

27 ला होणार शुभारंभ
या कार्यात श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन, मुंबई तर चांदोरकर प्रतिष्ठानने या नाटकाचे सर्व प्रकारचे व्यवस्थापन करायचे ठरवले. या कार्याचा एक भाग म्हणून स्थानिक व हौशी कलावंतांना घेवून व्यावसायिक स्तरावर एक दर्जेदार नाट्यनिर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला असून गेल्या तीन महिन्यांपासून चाललेल्या या कार्याचे अंतीम स्वरुप आता प्रेक्षकांसमोर येत आहे. 27 मे 2017 रोजी सायंकाळी 7 वाजता कै. भैय्यासाहेब गंधे सभागृहात या निर्मितीचा शुभारंभाचा पहिला प्रयोग निश्‍चित करण्यात आलेला आहे.