शिरपूर : तालुक्यातील चाकडू येथील ग्रामपंचायतीत झालेल्या ६७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात संशयित सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आठवडाभर उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिरपूर तालुका पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाती घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला टाळे लावत बीडीओना काळे फासण्याचा इशारा दिला.
प्रहारच्या संभाव्य आंदोलनाच्या भीतीने २६ जूनला रात्री १२.३० सांगवी पोलीस ठाण्यात सरपंच ठुमबाई मुखडे व ग्रामसेवक रवींद्र तमखाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराला वाचा फोडून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिल्याबद्दल उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी प्रहारचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांचे पुष्पगुच्छ देऊनआभार मानले आहेत.