कांद्याची विक्रमी आवक; आखाती देशात पसंती
चाकण : आखाती देशात चाकणच्या कांद्याला चांगली पसंती मिळाल्याने हा कांदा आता दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत या देशांमध्ये निर्यात होऊ लागला आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुलाब गोरे पाटील आणि जमीरभाई सुन्नूभाई काझी हे व्यापारी हा कांदा आखाती देशात पाठवित आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात सन 2017 -18 सालामध्ये 28 फेब्रुवारीअखेर 11 लाख 19 हजार 582 कांदा पिशव्यांची म्हणजेच 5 लाख 60 हजार 222 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी 700 व जास्तीत जास्त 4 हजार आणि सरासरी 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी जाणवत आहे.
चाकण बाजार समितीमध्ये गुलाब सोपाना गोरे पाटील यांच्या प्रशांत ट्रेडिंग कंपनी व जमीरभाई सुन्नुभाई काझी यांच्या जे. के. एक्स्पोर्टमार्फत दोन्ही अडत्यांनी कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी कांद्याचे निर्यात करून शेतकर्यांना परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सध्या निर्यात व आडते आखाती देशांमध्ये विशेषतः दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत याठिकाणी कांदा निर्यात करीत आहेत. चाकण येथील बाजारात सन 2017 -18 सालामध्ये 28 फेब्रुवारीअखेर 11 लाख 19 हजार 582 कांदा पिशव्यांची म्हणजेच 5 लाख 60 हजार 222 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी 700 व जास्तीत जास्त 4 हजार आणि सरासरी 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षात कांदा बाजारात एकूण 1 अब्ज 7 कोटी 61 लाख 34 हजार 350 रुपये उलाढाल झाली असून, बाजार समितीला मार्केट फीच्या माध्यमातून 1 कोटी 7 लाख 61 हजार 342 उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
ठळक बाबी
1. कांदा बाजारात 1 अब्ज रुपयांची उलाढाल
2. चालू वर्षात चाकण बाजारात 11 लाख 19 हजार 582 कांदा पिशव्यांची आवक
3. बाजार समितीला मार्केट फीच्या माध्यमातून 1 कोटी 7 लाख 61 हजार 342 उत्पन्न