मनोज यादव यांची रांजणगावला बदली
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती झाली आहे. चाकण यापूर्वीचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांची रांजणगाव पोलीस ठाण्यात बदली झाली. यादव यांच्या जागी गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धन्यकुमार गोडसे चाकणला येण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील यवत येथे कार्यरत होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चाकण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा पदभार गोडसे यांनी शनिवारी (दि.9) सकाळी स्वीकारला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी व अधिकार्यांनी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस निरीक्षक यादव यांचा निरोप समारंभ व पोलीस निरीक्षक गोडसे यांचे स्वागत करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था राखणार
गोडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपुरी व पन्हाळा तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, यवत, वडगाव-मावळ, वालचंदनगर, भिगवण व गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामीण असे काम केले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील माथेरान, महाड एमआयडीसी, श्रीवर्धन मांडव आदी ठिकाणी गोडसे यांनी चांगले काम केले आहे. पोलीस निरीक्षक गोडसे यांनी कायद्याची पदवीही संपादीत केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या आदेशान्वये चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या गावांमध्ये कायादा व सुव्यवस्था राखून, हद्दीतील अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे धन्यकुमार गोडसे यांनी चाकण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, गोपनीय विभागाचे शेखर कुलकर्णी, अजय भापकर, वीरसेन गायकवाड आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.