चाकण : गावाला जावून येते, असे सांगून घरातून गेलेल्या मायलेकी 15 दिवसांनंतरही अद्याप परत घरी आल्या नसून बेपत्ता झाल्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. प्रिती राहुल ओव्हाळ (वय 28 वर्षे) व त्यांची सहा वर्षांची कन्या राजलक्ष्मी राहुल ओव्हाळ (दोघीही रा. चाकण), असे बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहेत. प्रिती ओव्हाळ यांचे पती राहुल बळीराम ओव्हाळ यांनी फिर्याद दिली.
हे देखील वाचा
प्रिती ही तिची मुलगी राजलक्ष्मी हिला बरोबर घेऊन रविवारी (दि. 2) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान गावाला जाऊन येते, असे सांगून राहत्या घरातून चाकण येथून निघून गेल्या आहेत. तेव्हापासून त्या दोघीही परत घरी आल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नसल्याने त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.