चाकणमध्ये पार पडले आकर्षक स्टंट शो

0
केटीएम ब्रँडच्यावतीने केले आयोजन
चाकण : केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्डतर्फे चाकण येथे आकर्षक केटीएम स्टंट शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे आयोजन व्यावसायिक अशा स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत या उद्देशाने करण्यात आले होते. तसेच चाहत्यांना नवीन आणि अधिक प्रतीक्षेत असलेली ड्यूक 125 एबीएस बघण्याची संधी मिळाली. या स्टंट शोचे आयोजन हॉटेल साई रीजेंसी येथे पार पडले. यामध्ये व्यावसायिक अशा स्टंट टिमतर्फे श्‍वास रोखून धरणार्‍या स्टंट्सने आपली कला ही केटीएम ड्यूक बाईक्सच्या माध्यमातून दाखवली.
रेसिंग बाईक म्हणून प्रसिध्द 
अमित नंदी यांनी सांगितले की, केटीएम हा ब्रॅन्ड हाय परफॉर्मन्स रेसिंग बाईक म्हणून प्रसिध्द आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच केटीएम बाईक देत असलेल्या साहस आणि उत्साहाचा अनुभव आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. व्यावसायिक स्टंट्सचे हे कार्यक्रम विविध शहरांत होणार असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित करणार आहोत. केटीएम हा एक्सक्लूझिव्ह असा प्रिमियम ब्रॅन्ड असून यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अनोखा अनुभव देण्यास उत्सुक आहोत. केटीएमच्या चाहत्यांना या बाईक्स सिद्धेश्‍वर कॉम्प्लेक्स, कुरुळी येथे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.