चाकण : चाकण डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने परिसरातील मुले पालकांना शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे शिकविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ’इको फ्रेंडली गणपती’ संकल्पना राबविण्याच्या उद्देश्याने मुंगसे हॉस्पिटलच्या दालनामध्ये शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
डॉ.पल्लवी बेनके व डॉ. प्रज्ञा भवारी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी चाकण डॉक्टर्स असिसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस.बी. केदारे, सचिव डॉ. अमोल बेनके, डॉ. सचिन निकम, डॉ. सुहास जोशी, डॉ. भरत राऊत, डॉ. पल्लवी बेनके, डॉ. प्रज्ञा भवारी, डॉ. गोरे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती शिंदे, रोटरी क्लबच्या सदस्या सुशीला सातव आदी पालकांनी व मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पालक व मुलांनी स्वतः तयार केलेल्या गणेश मूर्तींची आपापल्या घरात प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे डॉ. बेनके यांनी सांगितले.
यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. एस.बी. केदारे म्हणाले, पर्यावरणाची हानी वाचावी म्हणून आम्ही लहान मुलांमध्ये आत्तापासूनच ’इको फ्रेंडली गणपती’ संकल्पना राबवित आहे. त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरण वाचविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.