चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे अखेर चाकण पोलिसांच्या सहकार्याने बुजविण्यात आले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघाताचा धोका व वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त दै.‘जनशक्ति’ मधून प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शिवाजी नर्हे, राजेंद्र हिले, सुरेश दिघे व त्यांच्या वार्डन बॉय पथकाने पुढाकार घेऊन तळेगाव रस्त्यावरील युनिकेअर हॉस्पिटल समोरील खड्डे बुजविण्यात आले.
पोलिसांच्या विनंतीनुसार उद्योजक साईनाथ घाटे यांनी खड्डयांसाठी एक ट्रक मुरूम दिला व आयआरबीचा रस्ता नसतानाही रस्ते कंपनीचे अधिकारी पाटील यांनी मजूरी दिली. सर्वांच्या सहकार्याने तळेगाव चौक ते श्रेया लॉन्स दरम्यानचे खड्डे बुजविण्यात आले.