पुणे-चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलनात घुसखोरी करीत परप्रांतीयांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात खुसखोरी करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण दिल्याप्रकरणी ५ हजार जणांवर सामुहिक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
चाकण परिसरात एमआयडीसी असल्याने अनेक परप्रांतीय येथे कामानिमित्त राहतात, अशा लोकांवर पोलिसांचा संशय आहे. कारण यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अशा परप्रातीयांचा सहभाग उघड झाला आहे. या लोकांनीच अनेक पोलिसांना लक्ष करीत त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली, तर त्यांच्या वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली. एका पोलिस कर्मचाऱ्याला सात जणांच्या समुहाने बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
समाजकंटाकांच्या हल्ल्यात २ डीवायएसपी, २ पोलीस निरीक्षक, १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक सामान्य नागरिकांनाही मारहाण केली आहे.