चाकण येथे स्त्री जन्माची प्रतीकात्मक गुढी

0

चाकण : नाणेकरवाडी (चाकण) येथील हरि ओम् महिला मंडळाने मराठी नववर्षदिनानिमित्त स्त्री जन्माची प्रतीकात्मक गुढी उभारुन गुढी पाडवा मोठ्या आनंदात साजरा केला. एक वर्षापूर्वी नाणेकरवाडी येथील रुपाली परदेशी, मंगल पांडे, सीमा परदेशी, लता नाणेकर, सुरेखा नाणेकर, मंगल जाधव, श्रद्धा नाणेकर, श्रद्धा कनोजी आदीं महिलांनी पुढाकार घेऊन या मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर, हळदीकुंकू यासारखे महिलांसाठीचे कार्यक्रम घेतले.

मंडळाचे पाऊल पडती पुढे
त्याचबरोबर हरि ओम् महिला मंडळाने स्वतःचे ढोलपथक तयार केले असून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत ढोलपथकाने वादन करून उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्त्री जन्माची प्रतीकात्मक गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या रुपाली परदेशी, मंगल पांडे, सीमा परदेशी, लता नाणेकर, श्रद्धा कनोजी, मंगल जाधव, श्रद्धा नाणेकर व सुरेखा नाणेकर यांच्यासह नाणेकरवाडी येथील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.