डायव्हर्टेड गाड्यांमुळे ट्रॅफिक वाढल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय
भुसावळ- मुंबईत झालेल्या पावसानंतर अनेक रेल्वे भुसावळमार्गे सुरतकडून वळवण्यात आल्यानंतर या मार्गावर वाढलेली ट्रॅफिक पाहता रेल्वे प्रशासनाने गुरुवार, 12 रोजी सायंकाळी सुटणारी 59014 भुसावळ-सुरत व याच दिवशी रात्री 9.15 वाजता सुटणारी भुसावळ-सुरत पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. विशेष म्हणजे खान्देशातून मोठ्या प्रमाणावर सुरत पॅसेजरने प्रवासी सुरतकडे जातात शिवाय अल्प भाड्यात सुरत जाण्याची सोय असल्याने भुसावळ, जळगावसह, नंदुरबार, नवापूरसह विविध भागातील प्रवाशांना या गाडीला अधिक पसंती असते.
ट्रॅफिक वाढल्याने निर्णय
मुंबईत पाऊस झाल्याने अनेक गाड्यांचे बुधवारी मार्ग बदलल्यानंतर काही गाड्या भुसावळ मार्गाने वळवण्यात आल्या होत्या तर गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त करीत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता त्यातच गुरुवारी पुन्हा सायंकाळची व रात्रीची पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने नियोजित ठिकाणी प्रवास करणार्या प्रवाशांना मोठ्या हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागणार आहे तर आरक्षित बुकींग केलेल्या प्रवाशांना पैशांचे रीफंड केले जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, गुरुवारी रात्री 8.40 वाजता भुसावळ स्थानकावर येणार्या पुरी-अहमदाबाद गाडीला सुरत जाण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे