तळवडे (प्रतिनिधी) – ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रुपीनगर येथे रविवारी सकाळी घडली. मंगल जालिंदर सूर्यवंशी (वय 59 रा. नवनिर्माण हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी योगेश मधुकर आगाव (वय 21 रा. बालघरवस्ती, कुदळवाडी) या ट्रक चालकाच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील सूर्यवंशी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ट्रकचालक योगेश ट्रक रीव्हर्स घेत असताना मंगल यांना ट्रकचा धक्का लागून त्या खाली पडल्या. यावेळी उजव्या बाजूचे ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.