चाकु हल्ल्यातील एकाला 22 पर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। हरिविठ्ठलनगरात 11 फेब्रुवारीला दोघांवर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने रविवारी रात्री 11 वाजता रामानंदनगर परिसरातील घाट रस्त्यात विशाल उर्फ भय्या राजेंद्र सोनवणे (वय 23) याच्यावर चाकूने हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा एका संशयिताला अटक केली होती.

त्याला सोमवारी न्या. के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 22 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हरीविठ्ठलनगरातील विठ्ठल उर्फ मावली पाटील , दीपक पाटील, किरण ऊर्फ पिंटू यशोद, संदीप ऊर्फ पप्पू यशोद (सर्व रा. हरि विठ्ठल नगर) यांनी मारहाण केल्याची तक्रार विशालने दिली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा संदीप उर्फ पप्पू अशोक यशोद (वय 25, रा. हरीविठ्ठलनगर) याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 22 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.