जळगाव । पाचोरा येथे पुर्ववैमनस्यातून एकावर तिघांकडून चाकु हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील एका संशयिताने दुसर्यांना अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असता त्यावर सोमवारी कामकाज होवून न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी फेटाळून लावला आहे.
पुर्ववैमनस्यातून पाचोरा येथे इकरा अशपाक बागवान या तरूणास भिलाल मुस्ताक बागवान, हरूल बागवान, अनिस बागवान या तिन भावडांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्यावर चाकु हल्ला केला होता. यात इकरा हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर इकरा यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यातील भिलाल बागवान, अनिस बागवान हे सध्या जामीनावर आहेत. तर हरूल याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर कामकाज झाले. त्यानंतर न्या. दरेकर यांनी हरूल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.