चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले

0

कल्याण । डोंबिवली पुर्वेकडील नांदीवली गोकुलधाम सोसायटीत राहणारा प्रवीण घाडगे हा 25 वर्षीय युवक काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरून जात असताना एका तरुणाने अचानक समोर येत प्रवीणच्या पोटावर चाकू टेकवून धमकी देऊन त्याच्या गळ्यातील 34 हजार पाचशे रुपयांची सोन्याची चैन खेचून पसार झाला .याप्रकरणी प्रविणने विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी निखिल भोईर विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सूरु केला.दरम्यान काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील दावडी नाका परिसरात राहणार्या विशाल खाणे हा तरून डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोड नेत्रालय प्लस जिम येथून पायी चालत जात असताना एका अज्ञात तरुणाने पाठिवर वार करत त्याची चैन हिसकावून पळ काढला होता या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच पुन्हा चाकूचा धाक दाखवून चैन हिसकवण्याचा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.