चाकूचा धाक दाखवून साडेसहा लाख लुटले

0

तळेगाव : येथील बेबेड ओहळ येथे एकाला तिघांनी चाकूचा धाक दाखवून साडेसहा लाख रुपयांना लुटले. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाली. येथील एका खासगी कंपनी येथे काम करणारा कर्मचारी तळेगाव येथून बँकेतून साडेसात लाख घेऊन दुचाकीवरून बेबेड ओहळ येथे चालला होता. यावेळी पवना नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे तीन अज्ञातांनी त्याला अडवले व चाकूचा धाक दाखवून त्याला लुटले. यावेळी त्याने झटापट केली असता त्याच्यावर चाकूने वार केले. या झटापटीत एक लाख रुपये खाली पडले व चोरट्यांनी साडेसहा लाख रुपये घेऊन पोबारा केला.