जळगाव । पोलीस असल्याचे सांगत तोंडाला रूमाल बांधून आलेले दोघे बंगल्याच शिरले. तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करत, धारदार शस्त्राचा धाक दाखवित, तसेच सोबतच्या मुलीवर बलात्काराची धमकी देत मंगळसूत्र घेवून दोघांना पोबारा केला. गुरूवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक दाम्पत्याने हा थरार अनुभवला़ महिलेने आरडोओरड केल्याने प्रकार उघडकीस आला़ व चोरटे पसार झाले. एमआयडीसी परिसरातील घटनेला दिवस उलटत नाही तोच दुसर्या दिवशी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे़ शिवसेना महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा मंगला बारी याचा रायसोनी नगरात गट नं 458 प्लॉट नं 36 येथे बंगला आहे़ या बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून याठिकाणी फर्निचरचे काम सुरू आहे़ बांधकाम सुरू असल्यापासून बारी यांना याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी मध्यप्रदेश येथील रोहीदास जाधव हा वॉचमन ठेवला आहे़ वॉचमनला राहण्यासाठी बंगल्याच्या तळमजल्यावर खोली आहे़ खाजगी निमित्ताने सात ते आठ दिवसांपासून जाधव मध्यप्रदेशात गावाकडे गेलेले आहेत.गावाकडे गेलेले जाधव यांचा अपघात झाल्याने त्यांनी त्याच्या जागी त्यांचा शालक भिमा बुधा राठोड रा़ उमरा, ता़मुक्ताईनगर यांना वॉचमन म्हणून जळगावला पाठविले़ भिमा राठोड हे पत्नी सविता, व दोन मुलांसोबत चार ते पाच दिवसांपूर्वीच जळगावात आले़
सुरक्षारक्षकाच्या गळ्याला लावला सुरा
भिमा राठोड हे पत्नी़ मुले व नातेवाईक 13 वर्षाची मुलगी याच्यांसोबत बंगल्यातील खोलीच्या बाहेर झोपले होते़ रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीस ते चाळीस वयोगटातील दोघे जण तोंडाला रूमाल बांधलेले बंगल्यात शिरले़ दोघांपैकी एकाने राठोड यांना आम्ही पोलीस असून तुम्ही कोण, कुठले राहणार, सर्वांचे नाव गाव पत्ता सांगा विचारला़ राठोड माहिती देत असताना विचारणाजयाने त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ व गळ्याला धारदार शस्त्र लावून राठोड यांच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र दे, अन्यथा तुझ्या नवजयाला ठार मारू असे सांगितले़ प्रचंड घाबरलेल्या सविता राठोड यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले़ मंगळसूत्र हातात पडताच दोघांनी पैशांची मागणी केली़ भिमा राठोड यांनी त्यांच्या खिशातील शंभर रूपये तर त्यांच्या पत्नी सविता यांनी त्यांच्याकडील चाळीस रूपये घेतले़
मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दोघा दरोडेखोरांनी पैसे व दागिणे घेतल्यानंतर राठोड यांनी पोलिसांनी फोन करू नये म्हणून त्यांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून घेतले. यानंतर चोरट्यांनी राठोड यांना बंगल्याच्या चाब्या मागितल्या़ त्यांनी पत्नीकडे असल्याचे सांगितले़ तेवढ्यात दोघांपैकी एकाने चाब्या द्या अन्यथा तुमच्या सोबतच्या मुलीवर बलात्कार करू, अशी धमकी दिली़ भेदरलेल्या सविता यांनी त्यांना तत्काळ बंगल्याच्या चाब्या काढून दिल्या. सविता राठोड यांनी दोघांपैकी एकाकडे बंगल्या चाब्या देत आरडाओरड केली़ व जवळच बांधकामठिकाणी सुरक्षारक्षक असलेल्या नातेवाईक अजमल राठोड व सदाशिव राठोड यांच्याकडे पळत सुटल्या़ राठोड यांचे नातेवाईक व बंगल्यासमोरील रहिवासी पंकज भावसार हे बारी यांच्या बंगल्याजवळ जमले़ भावसार यांनी कन्हैय्या बारी यांना मोबाईलवर संपर्क साधला़ मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ अखेर भावसार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन केला़ व त्यांना मंगला बारी यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करून लुटल्याचा प्रकार कथन केला़ गस्तीवरील गुन्हे शोध पथकातील गोपाळ पाटील हे सहकाजयांसह घटनास्थळी आले़ मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते़ यानंतर गोपाळ पाटील यांनी मंगला बारी यांना संपर्क साधला़ त्यानुसार मुलगा कन्हैयासह मंगला बारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बंगल्यावर पोहचल्या़.
घराच्या काही अंतरावर मिळाल्या चाव्या
रामानंदनगर पोलिसांचे वाहन रायसोनी नगरात नियमित गस्तीवर येते़ नेहमीप्रमाणे पोलिसांचे वाहन तीन वाजता मंगला बारी यांच्या घराजवळून गेले़ पोलीस वाहन रवाना होताच सव्वा तीन वाजेच्या सुमारास दोघे बंगल्याच शिरले़ पोलीस असल्याचे सांगत माहिती विचारली़ आत्ताच पोलीस वाहन गेले म्हणून खरोखर पोलीस असावे, म्हणून राठोड यांना शंका आली नाही़ आरडाओरड झाल्याने दोघे बंगल्या पासून काही अंतरावर चाबी फेकून पसार झाले़ सकाळी बंगल्याबाहेर चाब्या आढळून आल्या. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.