पिंपरी-चिंचवड : चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्या चौघांच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चार मोबाईल आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच त्यांचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. समीर अजीत पठाण (वय 18, रा. नवजीवन होसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), अक्षय एकनाथ कानडे (वय 19, रा. तळेगांव, गावठाण), प्रसाद पांडुरंग भालेकर (वय 18, रा. घरकुल, चिखली) आणि त्यांचा एका अल्पवयीन साथीदार यांना अटक करण्यात आली आहे.
लुटमार करणारी टोळी चिखलीतील घरकुल येथे येणार असल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांना खबर्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघा जणांना अटक केली. त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी, निगडी, विश्रामबाग पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, संजय गायकवाड, सहाय्यक फौजदार बेंडाळे, हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, नाईक किरण काटकर प्रणिल चौगले, मोहन जाधव, शिपाई अमोल निघोट, नवनाथ पोटे, करन विश्नासे, विशाल काळे, अनिल राक्षे यांनी ही कारवाई केली.