चाकूच्या धाकावर दहशत ; आरोपी जाळ्यात

जळगाव : शहरातील शिरसोली नाका परीसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी रात्री ८ अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरात गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी (२२, रा. सद्गुरु नगर, शिरसोली नाका, तांबापुरा) हा तरुण १५ इंच लांबीचा लोखंडी सुरा हातात घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील १५ इंच लांबीचे लोखंडी तिक्ष्ण हत्यार हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रगडे यांच्या फिर्यादीवरून गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे सचिन पाटील, विकास सातदिवे, किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी आदींच्या पथकाने केली.