चाकूच्या धाकावर दहशत : संशयीताला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव : गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परीसरातील हॉटेल तनयसमोर हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पराग प्रकाश लोहार (20, योगेश्वर नगर, ज्ञानचेतना अपार्टमेंट, खेडी, जि. जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा
राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज जवळील तनय हॉटेलसमोर एक तरूण हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रताप शिकारे यांना मिळताच त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, एएसआय आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक मुदस्सर काझी, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, साईनाथ मुंडे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्या तावब्यातून चाकू जप्त केला. संशयीत पराग प्रकाश लोहार (20, योगेश्वर नगर, ज्ञानचेतना अपार्टमेंट, खेडी, जि.जळगाव) याच्या विरोधात कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.