चाकूच्या धाकावर सेल्समनला लूटले ; 45 हजारांची लूट

0
भुसावळ :- कमिशन तत्वावर तेल, साबल , गुलाबजल विक्री करणार्‍या सेल्समनला चाकूचा धाक दाखवत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटल्याची घटना 12 रोजी दुपारी चार वाजता जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरामागील डॉ.आंबेडकर हॉस्टेलमागे घडली. या प्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लुटारूंनी सात 500 रुपयांच्या रोकडसह 37 हजार 600 रुपये किंमतीचे सहा मोबाईल लांबवले. या प्रकरणी परमेश्‍वर भिकन भालेराव (वाडी बु.॥, ता.भोकरदन, जि.जालना, ह.मु.श्रद्धा नगर, मिलिंद चौधरी यांच्या घरात, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. दिल्लीच्या ग्लेझी ट्रेडींग इंडिया प्रा.लि.या कंपनीत सेल्समन आहेत. त्यांच्यासह सहकारीस गणेश पवार, दत्ता आखरे, कृष्णा कालगुडे, नवनाथ बोबडे हे साहित्य विकून घराकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत धमकावले व त्यांच्याकडील मोबाईल व रोकड काढून पोबारा केला. आरोपींपैकी एकाने नाईट पँट, अंगात करडा शर्ट तर दुसर्‍याने  काळ्या रंगाची पँट तसेच काळ्या-सावळ्या रंगाचा शर्ट घातला होता तर 23 ते 27 त्यांचा वयोगट असल्याचे तक्रारीत नमूद आहे.