चाकू हल्यातील पसार आरोपीला अटक

0

भुसावळ : चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यातील पसार संशयित आरोपीला अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. सागर संतोष ढोले (22, रा.भारत नगर, भुसावळ) असे  अटकेतील आरोपीचे नाव आहे. 8 एप्रिल रोजी आरोपीविरुद्ध चाकू हल्ला केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक  देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर महाजन व विकास सातदिवे यांनी केली.  तपास निलेश बाविस्कर करीत आहेत.