चाकू हल्ला करीत हॉटेल मालकास लूटले

0

सोनगीर हद्दीतील घटना ; तीन जण जखमी

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील तालुक्यातील सरवड गावालगतच्या एका हॉटेलवर चार अज्ञात आरोपींनी मध्यरात्री लूट करीत एक हजार 800 रुपयांची रोकड लांबवली. आरोपींनी हॉटेल मालकास पाठीमागून चाकू मारला तर अन्य जणांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी घटनेला दुजारो देत हॉटेल मालकास तक्रार दयावयास सांगितले असल्याचे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जावून माहिती जाणून घेतली.