चाकू हल्ल्यातील संशयीत जाळ्यात

भुसावळात बाजारपेठ पोलिसांची कारवाई : जुन्या वादातून तरुणावर झाला चाकूहल्ला

भुसावळ : तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून 22 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील दीनदयाल नगरात सोमवार, 31 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती. या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या बाजापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेख अरबाज शेख शब्बीर (दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जुन्या वादातून केला होता चाकूहल्ला
सुमारे तीन वर्षांपूर्वी गुलाम शहा यांचे दारू पिण्याच्या कारणावरून संशयीत आरोपी शेख अरबाज शेख (भुसावळ) याच्यासोबत भांडण झाले होते मात्र नंतर हे भांडण मिटले होते मात्र सोमवार, 31 रोजी सायंकाळी साडेसात वाजता जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून संशयीत आरोपी शेख अरबाज शेख याने गुलाम गौस हे जामनेर रोडवरील दीनदयाल नगराजवळ उभे असताना अचानक पाठीमागून येवून पाठीवर चाकू मारून पळ काढला होता. हल्ल्यानंतर संशयीत पसार झाला होता. बुधवारी सायंकाळी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी केली आरोपीला अटक
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, नाईक रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींनी आरोपीच्या दीनदयाल नगर भागातून मुसक्या आवळल्या.