चाचणी परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्काराचा इशारा

0

शहादा । नोंव्हेंबरमध्ये साधारणतः पहिल्या आठवडयात किंवा दुसर्‍या आठवड्यात शासनातर्फे पायाभुत चाचणीनंतर संकलीत मुल्यमापन चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या आधारावर सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना विद्यार्थीसंख्याप्रमाणे पुर्ण प्रश्न पत्रिका उपलब्ध कराव्यात. कमी प्रश्न पत्रिका मिळाल्यास संबंधीत शाळा संकलीत मुल्यमापन चाचणी परीक्षावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

चाचणी परीक्षा केवळ नावाला
एका बाजुला शासन सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्वाना शिक्षण उपक्रम राबवित असतांना शासनाचा परिक्षांना अपूर्ण प्रश्नपत्रिका पुरवुन आपली लक्तरे उघडी करतात. शिक्षकांची तारंबळ करतात. वास्तविकता दोन महिने अगोदर शिक्षण खाते प्रत्येक शाळेतुन विद्यार्थी संख्या मागवतात त्याची माहिती शासनाकडे जाते. असे असतांना शासन अपूर्ण प्रश्न पत्रिका का पुरवतात. यापेक्षा शासनाने अशी परीक्षा घेवु नये किंवा सर्व शाळांना पूर्ण प्रश्न पत्रिका द्याव्यात अशी मागणी आहे . प्रश्नपत्रिकाबाबत शिक्षण खात्यांतील अधिकारी मनमानी कारभार करतात. नुकतीच पायाभूत चाचणी झाली. हीचाचणी परीक्षा अपुर्ण प्रश्नपत्रिकांमुळे चांगलीच गाजली. अक्षरशः प्रत्येक शाळांना शिक्षकांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन सत्यप्रती काढुन प्रश्नपत्रिका पुरविल्या जातात. काही शाळांना तर दहा हजार रुपयांपर्यंत पैसा खर्च करावा लागला होता. शिक्षकांना भुर्दंड भरावा लागला. गेल्यावर्षी देखील असाच सावळा गोंधळ प्रश्नपत्रिकाबाबत झाला होता. शासनच याची गांभीरता घेत नाही. आता ही चाचणी परीक्षा केवळ नावाला राहिली आहे.