चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाहीत!

0

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरु झाले आहे. चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न मोदींनी कितीही केला तरी ते चाचा नेहरु यांची जागा घेवू शकत नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.