चाचा नेहरूंना जयंतीनिमित्त अभिवादन

0

धुळे । जिल्ह्यात देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील , रविंद्र भारदे यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर बाल दिवसानिमीत्त उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी बालकामगारमुक्त समाज व सर्वांना शिक्षण याबाबत शपथ घेतली.

आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय
शिरपूर । येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन हा बालदिवस म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे पर्यवेक्षक श्री.के.आर.जोशी यांनी परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना चाचा नेहरु यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. बालदिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे पर्यवेक्षक श्री.के.आर.जोशी यांनी भूषविले.तसेच प्रमुख पाहूणे म्हणून शाळेत स्मरणशक्ती विकास मार्गदर्शक महेंद्रकुमार डिगराळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. डिगराळे सरांनी स्मरणशक्ती विकसीत करण्याचे काही मार्ग तसेच अभ्यास करण्याची पध्दत यावर व्याख्यान दिले.सदर कार्यक्रमाचे सूञसंचालन श्री.आर.आर.महाजन यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.डी.गाडीलोहार, एम.व्ही.सूर्यवांशी, एम.जी.अहिरे यांनी प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट वाटप
जैताणे । साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दु शाळा जैताणे येथे भारताचे पहिले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बाल दिवस साजरा करण्यात आले यावेळी शाळेतील इयता तिसरी चा विघार्थी हिमायु जाविद शाह यांनी चाचा नेहरूंचा पौषाख धारण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी. यावेळी विद्यार्थींना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. लहान मुलांना चॉकलेट बिस्किटे वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला प्रतिनिधी पालक शहजादीबी शाह होती. शाळेच्या मुख्याध्यापिका एम. आय. शेख यांनी चाचा नेहरू व बालदिवसाबाबत माहीती दिली. यावेळी शिक्षक इम्रान अनसारी यांनी सुत्रसंचालन व प्रस्तावना केली. मुख्याध्यापिका शेख यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यसथापन समितीचे सदस्य पदाधिकारी, महिला व विघार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. जैताणे जिल्हा परिषद उर्दु शाळेत बालदिन व पंडीत नेहरू जयंती उत्सव हात साजरा करण्यात आली.

बोराडीत बालदिवस उत्साहात
शिरपूर । बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिवस म्हणून उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणीताई रंधे होत्या . यावेळी पंडित नेहरू यांचे बालपण व सामाजिक जीवनकार्यावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात लहान गटात प्रथम वैष्णवी मोरे, द्वितीय प्रांजली सोनवणे तर तृतीय कविता भिल आली तर मोठ्या गटात प्रथम तनुश्री पाटील, द्वितीय चेतना पाटील,तर तृतीय सोनम गोसावी आली.यावेळी शाखाप्रमुख टी. टी.बडगुजर,पर्यवेक्षक एस.आर.बडगुजर, एन.एम.सोनवणे, व्ही.पी.पवार,टी.टी.ढोले,बी. एन. ठाकरे, जे. पी.पावरा,डी.जे.चव्हाण सी.एस.बडगुजर ,इ उपस्थित होते.सुत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख व्ही. पी.पवार यांनी केले तर जी.सी.भामरे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या वाढदिवसासह बालदिन उत्साहात
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील,ज्येष्ठ शिक्षिका आर.डी. माळी,एम.आर.सोनवणे, स्मिता साळुंखे, जगदीश सोलंकी,रमेश शिरसाठ, प्रकाश ईशी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बालदिनाचे औचित्य साधून गणेश प्रविण पाटील, कोमल गोकुळ पाटील (इयत्ता: पहिली),प्रणिती गजानन पाठक (इयत्ता :तिसरी) या शाळेतील विदयार्थ्यांचा वाढदिवस गुलाब पुष्प देऊन साजरी करण्यात आला. मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार महेंद्र माळी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजेंद्र जाधव, अविनाश राजपूत, योगेश बागुल ,अनिल माळी,संदीप चौधरी ,सुभाष भिल,यांनी परिश्रम घेतले.

चला सजवू या रांगोळी
शिरपूर । टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत बालदिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक रूपेश कुलकर्णी यांनी पंडित नेहरु बोलतो या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.आर.महाजन यांनी केले. मुलांकडून चला सजवू या रांगोळी फुलांची या उपक्रमातंर्गत रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन सुंदर फुंलाच्या रांगोळी विद्यार्थ्यानी काढल्या .यात धनगर हरीष धनराज, भोई तृप्ती सुनिल, भोई वैष्णवी कांतिलाल, धनगर राज विजय, राजपूत प्रतिक्षा दिपक यांनी क्रमांक पटकाविला. मोतिलाल पटेल , साहेबराव चौधरी, सुवर्णा धनराज धनगर,विमलताई कोळी , सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किशोर सोनवणे, दिपक महाजन, सुंनदा सोनार, भाईदास पावरा, अभिजीत ईशी यांचे सहकार्य लाभले.