चापेकरवाड्याचा तिसरा टप्पा होणार

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिसर्‍या टप्याचे काम महापालिकेतर्फे करण्याचा व त्यासाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय बुधवारी साप्ताहिक सभेत घेण्यात आला. विषयपत्रिकेवर अवलोकनाचे 22 तर मंजुरीचे 14 विषय होते. यापैकी दोन विषय तहकूब करण्यात आले आहेत. तर, एक विषय प्रशासनाने मागे घेतला आहे. चापेकर वाडा विषयाला मंजुरी देण्यात आली.

निविदापूर्व एक टक्का रक्कम
चिंचवडगावात क्रांतिवीर चापेकर वाडा आहे. त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. वाड्याच्या तिसर्‍या टप्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कामाचे नियोजन व आराखडा करण्यासाठी किमया आर्किटेक्ट किरण कलमदाणी यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली. प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्यांना निविदापूर्व कामासाठी एक टक्का व निविदा पश्चात कामासाठी 1.35 टक्के रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे.