40 कोटींच्या कामांना ÷‘स्थायी’ची मंजुरी
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 40 कोटी 53 लाख 61 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. चाफेकर बंधू उड्डाणपुलाचे सुशोभिकरणासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 84 लाख 79 हजार, वडाचामळा परीसरातील ताब्यात आलेले विकास आराखड्यातील रस्ते विकसीतसाठी नऊ कोटी 79 लाख 12 हजार, संत तुकारामनगर येथील महेशनगर चौक ते अग्निशामक चौक पर्यायी रस्ता व उपरस्ते विकसित करण्यासाठी 38 लाख 61 हजारांच्या कामाचा यामध्ये समावेश आहे.
वाहिन्यांसाठीचे चर मुजवून डांबरीकरण
ग प्रभागांतर्गत खाजगी कंपन्या व मनापामार्फत विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केल्याने झालेले चर एम.पी.एम., बी.एम. व बी.सी. पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे चार कोटी 13 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास, पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातून संरक्षण विभागाच्या हद्दीतुन जाणा-या 18 मीटर डी.पी. रस्त्यास सबवे करणे व ताब्यात येणारा 12 मिटर रुंदीचा रस्ता विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे सात कोटी 32 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्मशानभूमीमध्ये प्रतिक्षा कक्ष
रहाटणी गावठाण येथील स्मशानभूमी मध्ये वेटींग शेड बांधणेसह स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे दोन कोटी 15 लाख 20 हजार रुपयांच्या खर्चास, ड प्रभाग अंतर्गत खाजगी कंपन्या व मनपा मार्फत विविध सेवा वाहिन्या टाकणेसाठी खोदकाम केल्याने झालेले चर एम.पी.एम., बी.एम. व बी.सी. पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे तीन कोटी 32 लाख 36 हजार रुपयांच्या खर्चास, ड प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे चार कोटी 37 लाख 2 हजार रुपयांच्या खर्चास, सांगवी किवळे रस्त्यावर सांगवी फाटा येथे ढोरे पाटील सबवे ते औंध परिहार चौकपुलापर्यंतचा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे 7 कोटी 20 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.