चारचाकीच्या धडकेत अंबीलहोळच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

भुसावळ: भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जगन्नाथ बागमल पवार (55, अंबीलहोळ, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास हा शहरातील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. पवार हे आपल्या दुचाकी (एम.एच.19 सी.एस.2794) ने जात असताना संशयीत आरोपी रामचंद्र काशीराम म्हस्के (शेलवड, ता.बोदवड) यांच्या चारचाकी (एम.एच.22 एच.सी.2904) ने धडक दिल्याने पवार यांचा मृत्यू झाला. जामनेर रोडवरील पंपाजवळ अपघात झाला.