भुसावळ : नवोदय विद्यालयाजवळ एका चारचाकी वाहनाला डंपरने कट मारल्याने संतप्त प्रवाशांनी डंपर चालकाला चोपल्याने महामार्ग काही वेळासाठी ठप्प झाला. शनिवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली.
साकेगावकडून भुसावळकडे येणारा डंपर (एम.एच.19 झेड. 4877) चालक गोकूळ सपकाळे हे शहराकडे आणत असताना त्याचवेळी चारचाकी (एम.एच. 19 सी.पी. 91) ला कट लागल्याने काहींना किरकोळ दुखापत झाल्याने उपस्थित जमावाने डंपर चालक सपकाळे त्याच्या सहकार्याला चांगलेच बदडले. गुन्हा मात्र दाखल नाही.