वरणगाव। येथून जवळच असलेल्या जाडगाव फाट्याजवळ कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना 6 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. भुसावळकडून वरणगावकडे जाणारी कार (क्र.एमएच 19 एपी 4533) वरणगावकडून भुसावळकडे जाणार्या रीक्षा (क्र.एमएच 19 व्ही.1571) वर जोरदारपणे धडकले. यात कारचालक सुश्रृत झोपे (वय 25, रा.भुसावळ) यांच्यासह अॅपेतील सहा प्रवासी जखमी झाले.
अॅपेचालकासह प्रवासी जखमी
अॅपे चालक मुन्ना सतावकर (वय 24, रा. रामपेठ) यांच्यासह प्रवासी दुर्गा दीपक कोळी (वय 25, रा.तळवेल), सचिन सीताराम पवार (रा. भुसावळ), धनराज विलास सपकाळ (रा.हरताळा), हिनल संजयकांत तायडे (वय 22), मीनल राहुल बोदडे (वय 20, रा.वरणगाव) हे सहा जण जखमी झाले आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारमधील व्यक्तींनी अपघातग्रस्त झालेल्या रिक्षाचालकास व प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप आहे. वरणगाव पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.