चारठाणा येथील शिवसेना (शिंदे गटाचे)उपसरपंच शांताराम सोनवणे, ग्रा पं सदस्य मनोज पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील शिवसेना (शिंदे गटाचे)उपसरपंच शांताराम सोनवणे, ग्रा पंचारठाणा येथील शिवसेना (शिंदे गटाचे)उपसरपंच शांताराम सोनवणे, ग्रा पं सदस्य मनोज पाटील सदस्य मनोज पाटील यांनी माजी महसुल मंत्री आ .एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी एकनाथराव खडसे यांनी शांताराम सोनवणे आणि मनोज पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले

याप्रसंगी रोहिणी खडसे म्हणाल्या

मा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे.

आगामी काळात आ. एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू तुम्हीं गावाच्या विकासासाठी आमच्या सोबत आला आहेत आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी

निश्चित पाठपुरावा करू असे रोहिणी खडसे यांनी सांगितले

 

यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले राष्ट्रवादी काँगेस पक्ष हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे कितीही वादळे संकटे आले तरी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली

पक्षाची अखंड वाटचाल सुरु आहे

तुम्हा सर्वांचे मी पक्षात स्वागत करतो

चारठाणा गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला आहे त्यातुन गावात रस्ते, गटारी, अंगणवाडी, शाळा खोल्या,सभागृह, अशा मुलभूत सुविधांची निर्मिती झाली आगामी काळात सुध्दा चारठाणागावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आ एकनाथराव खडसे यांनी दिली

 

 

यावेळी निवृत्ती पाटील, राजेंद्र माळी,श्रीराम पुरकर बाळा सोनवणे , महेश भोळे,विलास पुरकर, मुन्ना बोडे, सोनु पाटील, अमित खेवलकर,विकास पुरकर, राजू पाटकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते