चारठाणा शिवारातून चोरट्यांनी पाण्याचे टँकर लांबवले

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील चारठाणा शिवारातील आसराई नदीवरील बंधार्‍यावर उभे असलेले पाण्याचे टँकर व मिनी मिक्सर मशीन अशे सुमारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचे यंत्र अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घअना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथील अनंता रामभाऊ चोपडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनी मिक्सर वर रफीज खान ठेकेदार असे लिहिलेले आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शेजोळे हे करीत आहेत.