रांची । चारा घोटाळ्यातील लालू यादव यांचा जामीन अर्ज झारखंड हायकोर्टाने फेटाळला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टाने एम्स आणि रिम्सच्या रिपोर्टवर उत्तर मागवले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार होणार आहे. चाइबासाच्या पूर्वी पहिल्या आणि दुसर्या प्रकरणात कोर्टाने लालुंना 5-5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 23 फेब्रुवारीला हायकोर्टाने देवघर केसमध्ये लालुंचा जामीन अर्ज फेटाळला होता. काही दिवसांपूर्वी लालुंना उपचारासाठी बिरसा मुंडा तुरुंगातून दिल्लीच्या एम्सला हलवण्यात आले होते.
जामीन मिळाला तरी तुरुंगातून बाहेर येणे कठीण
चाइबासा ट्रेझरीतील अवैध रक्कम उचलल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. एस. प्रसाद यांच्या कोर्टाने लालू यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूंकडून हायकोर्टात जामीनअर्ज दाखल करण्यात आला होता. कायदेतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर या केसमध्ये लालुंना जामीन मिळाला तरी त्यांना तुरुंगातच राहावे लागेल. कारण दुमका ट्रेजरी आणि इतर प्रकरणांतील शिक्षा त्यांना भोगावी लागेल.