जळगाव । भंगार व्यवसायातील कुख्यात गुन्हेगार यासीन खान मासुम खान उर्फ यासीन मुलतानी याच्यासह अजीज बाबुखान पठाण (रा.गेंदालाल मील, जळगाव), पिंट्या उर्फ सतीश रामदास कासार (रा.इंदीरा नगर, जळगाव) व किरण शंकर खर्चे (रा.अयोध्या नगर,जळगाव) या चार गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या चारही गुन्हेगारांचा तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठविला होता.
यांच्यावर झाली कारवाई
यासीन मुलतानी याला जळगाव, धुळे व बुलढाणा या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर उर्वरित तिघांना जळगाव व धुळे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यासीन मुलतानी याच्यावर चोरीचे वाहन घेणे, भंगारात त्याची विल्हेवाट लावणे, पोलिसांसह सरकारी कर्मचार्यांवर हल्ले करणे याशिवाय हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजिज पठाण, पिंट्या कासार व किरण खर्चे यांच्यावर देखील हाणामारी, मालमत्तेच्या संदर्भातील गुन्हे आहेत, शिवाय पडद्यामागे राहून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविण्याचे काम या गुन्हेगारांकडून केले जात असल्याने पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी या चारही गुन्हेगारांचा तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठविला होता.