चार डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन

0
पुणे : महापालिकेतील लोकशाही दिन मंगळवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळात महापालिकेच्या मुख्य भवनातील आयुक्त कार्यालयात होईल असे महापालिका जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी कळविले आहे. लोकशाही दिनासाठी उपस्थित रहाण्यासाठी किमान पंधरा दिवस आधी अर्ज करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.