चार दिवस एटीएम बंद?

0

मुंबई । नोटांच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात एटीएम बंदच आहेत. आता रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएमच्या सुरेक्षासाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने कालच रिझर्व्ह बँकेला तसे आदेश दिले होते. एटीएम सिस्टम अपडेट करण्यासाठी सलग तीन दिवस दररोज तीन तास एटीएम बंद राहू शकतात. एटीएम तीन ते चार दिवस बंद राहणार, अशीही चर्चा सध्या सुरु आहे. मात्र एटीएम बंद राहणार नाहीत, तर अपडेशनसाठी दिवसातील काही तास एटीएम सेवा बंद असेल. ज्या देशांवर नुकताच सायबर हल्ला झाला आहे अशा 99 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि पेमेंट कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे. सुदैवाने हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण धोका कायम आहे.

फाइल डिलीट करण्याची धमकी
2014 पासूनच मायक्रोसॉफ्ट विंडोज दझ ला सिक्युरीटी आणि इतर टूल्सही देत नाही. इतर देशातील सायबर हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजसाठी अपडेट रिलीज केली आहे. इंग्लंडच्या अनेक रुग्णालयाचे म्हणणे आहे की, त्यांचे कॉम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. जे कॉम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असे म्हटले आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा. या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला गेला आहे. रेनसमवेयर हा व्हायरस फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. सुदैवाने हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो. सहज पैसा मिळविण्याचा मार्ग म्हणून हॅकर्स वित्तीय संस्थांनाच लक्ष्य करतात.

बँकांपुढे आव्हान : दररोजचे काम सांभाळुन एटीएम संगणक प्रणाली अद्यायावत करणे बँकांसाठी जवळपास अशक्य आहे. संगणक व इंटरनेट क्षेत्रातील अत्यंत तरबेज मनुष्यबळ बँकांकडे सदैव उपलब्ध नसते. ही बँकांची खरी अडचण आहे. त्यामुळे बँकांना दररोज काही वेळ देवून 4/6 दिवसांमध्ये हे एकाप्रकारच्या दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. मनुष्यबळाचे आऊट सोर्सिंग केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय कामाचा मोठा व्याप असलेल्या बँकांपुढे सध्यातरी नाही.

बचावाचे उपाय
सिस्टममध्ये चांगल्या कंपनीचा अ‍ॅण्टीव्हायरस टाकून घ्या. अ‍ॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन वेळच्यावेळी अपडेट करा. कॉम्प्युटरला मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का?, याची खात्री करुन घ्या, तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा. संगणक व इंटरनेटबद्दल शक्य तेवढी सगळी खबरदारी घेणे हाच या संकटावरचा उपाय आहे.