चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत दोषींवर गुन्हे दाखल- गिरीष महाजन

0

मुंबई | अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत दोषींबर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन बोलत होते.

महाजन यांनी सांगितले, ही घटना गंभीर असून, यासंदर्भात चार लोकांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. यामध्ये दोन स्टाफ नर्स आणि वैद्यकीय अधिका-यांवर कारवाई करून त्यांना अटकही करण्यात आली होती.