चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0

पिंपरी : परिमंडळ तीनमधील चार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाकड, सांगवी, भोसरी व पिंपरी या पोलिस स्टेशनमधील निरीक्षकांचा समावेश आहे. सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या सर्व पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

संपत भोसलेंची वाहतूक शाखेत बदली
पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाकड ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील सतिश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत भोसले यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगवी ठाण्याच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची विशेष शाखेत बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.