फक्त 23 दिवसांत न्यायालयाचा निकाल
इंदूर : राजबाडा येथे ओट्यावर आई-वडिलांच्या मध्ये झोपलेल्या 4 महिन्यांच्या बालिकेचे अपहरण झाले होते. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने नराधम आरोपीस दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी 7 दिवस 7-7 तास फक्त हाच खटला ऐकला आणि 21 दिवसांत सुनावणी पूर्ण झाल्यावर 23व्या दिवशी शनिवारी निकाल दिला.नवा पॉक्सो अॅक्ट लागू हे पहिले प्रकरण आहे.
बिल्डिंगवरून फेकून हत्या
राजबाडाच्या मुख्य गेटजवळ 20 एप्रिल रोजी सकाळी आई-वडिलांच्या मधोमध झोपलेल्या 4 महिन्यांच्या बालिकेला उचलून आरोपी नवीनने श्रीनाथ पॅलेस बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये नेले होते, तेथे तिच्यावर 15 मिनिटे दुष्कृत्य केले. नंतर एका बिल्डिंगच्या छतावरून फेकून तिची हत्या केली. आरोपी नवीन हा मृत पीडित बालिकेचा मावसा आहे. 7 दिवसांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. 7 दिवस न्यायालयात सुनावणी झाली. यात 29 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. 7 दिवसांतच डीएनए टेस्टचे व अन्य अहवाल आले. यानंतर शनिवारी निकाल सुनावण्यात आला.